1. |
क |
एक्सीडेंट (अपघात) |
एखाद्या व्यक्तीस नुकसान / इजा पोहोचविण्यास कारणीभूत होणारी आणी जी अकल्पित व अन्न्वधानाने घडते अशी एखादी घटना किंवा प्रसंग. |
- |
- |
एक्सीडेंट बेनिफिट(अपघात लाभ) |
जो कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास, आश्वस्त रकमे इत्क्या रकमेचे हप्त्यांमधे प्रदानाच्या अतिरीक्त लाभाची तरतूद करतो आणी त्यानंतरच्या योजने अंतर्गत देय्य अस्लेले हप्ते माफ करतो. |
- |
- |
एज लिमीट्स (वय मर्यादा) |
निश्चित करण्यात आलेले किमान व कमाल वय, ज्यापेक्षा कमी व अधिक वयाच्या अर्जदारांचे अर्ज विमा कंपनी स्विकारणार नाही किंवा योजनांचे नुतनीकरण करणार नाही. |
- |
- |
एजंट (प्रतिनिधी) |
शासनाने परवाना दिलेला विमा कंपनीचा प्रतिनिधी, जो विम्याचे करार विषयक विनंती करतो, वाटाघाटी करतो किंवा करार घडवून आणतो आणी विमा कंपनीसाठी विमेदारांना सेवा देतो. |
- |
- |
एन्युईटी प्लॅन्स (वार्षिकी योजना) |
या योजना विमाधारकाला अथवा त्याच्या वैवाहिक साथिदाराला “ निवृत्तीवेतन” ( किंवा एकमुठी रक्कम व निवृत्तीवेतन यांचे मिश्रण ) प्रदान करण्याची तरतूद करतात. जर विमाकालावधीमध्ये या दोघांचा मृत्यू झाल्यास एकमुठी रक्कम निकटतम नातेवाईकास देण्याची तरतूद केली जाते. |
- |
- |
एप्लिकेशन फॉर्म (अर्ज) |
सामान्यत:एजंटने ( प्रतिनिधीने) आणि वैद्यकिय परिक्षकाने ( लागु असल्यास) अर्जदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भरला जातो व विमा कंपनीने पुरविलेला असतो.तो अर्जदाराने स्वाक्षांकित केलेला असतो व विमा योजना ( पॉलिसी ) दिली गेल्यास पॉलिसीचा एक भाग होतो. |
- |
- |
असाइन्मेंट (बेचन पत्र) |
असाइन्मेंट ( बेचनपत्र) म्हणजे कायदेशीर हस्तांतरण . एक पध्द्ती ज्यायोगे विमाधारक त्याचे हक्क अन्य व्यक्तीस देऊ शकतो.असाइन्मेंट पॉलिसी दस्ताऐवजावर मान्यता देऊन /पृष्ठांकन करून किंवा स्वतंत्र कराराद्वारे केले जाऊ शकते. असाइन्मेंटचे दोन प्रकार असू शकतात. |
2. |
ख |
बेनिफिशरी (लाभार्थी) |
विमेदाराच्या मृत्यूनंतर विम्याचे उत्पन्न घेणारा म्हणून ज्याचे नाव पॉलिसीमधे नमूद केलेले आहे अशी / अश्या व्यक्ती किंवा संस्था ( उदा.महामंडळ , विश्वस्त संस्था वगैरे ) |
- |
- |
बिझनेस इन्शुरन्स (व्यवसाय विमा) |
एक पॉलिसी ( योजना) जी लाभांचे संरक्षण, प्रथमत: , एखाद्या व्यक्तीला नव्हे तर एखाद्या व्यवसायाला देते.एखादा महत्वाचा कर्मचारी किंवा व्यवसायातील भागीदार अपंग झाल्यावर होणा-या सेवा नुकसानिची, नुकसान भरपाई व्यवसायाला देण्यासाठी अशी पॉलिसी प्रसृत केली जाते. |
3. |
ग |
कॅन्सलेबल (रद्द होऊ शकणारी) |
आरोग्य विम्याचा करार जो योजनेच्या मुदती दरम्यान विमा कंपनी किंवा विमेदारा कडून रद्द होऊ शकतो.. |
- |
- |
कोइन्शुरन्स (सहविमा) |
- 1)एक अशी तरतूद, ज्यामधे, विमेदार विमामुल्याच्या ठराविक प्रमाणापेक्षा कमी रकमेचा विमा कॅरी करत असेल तर , त्याला त्याच गुणोत्तराचे प्रमाणात, आवश्यक असणा-या रकमेशी असणा-या विम्याच्या रकमे इतकी मर्यादित नुकसान भरपाई मिळते.
- 2)आरोग्य विम्यामधे अनेकदा आढळणारी तरतूद, ज्यामधे, विमेदार व विमा कंपनी, योजनेअंतर्गत कव्हर केलेले नुकसानदोघेही ठराविक प्रमाणात वाटून घेतात, उदा. ८०% विमाकंपनी तर २०% विमेदार.
|
- |
- |
कन्व्हर्टिबल होल लाईफ पॉलिसी (दपरिवर्तनीय संपूर्ण जीवन विमा योजना) |
एक “ संपूर्ण जीवन विमा योजना” व “सावधी विमा योजना” यांचे मिश्रण, ज्यामधील तरतूदीनुसार, अत्यंत कमी विमा हप्त्या मधे कमाल जोखीम कव्हर केलेली असते, ज्यामधे जिवन विमेदार त्याच्या करकिर्दीच्या अगदी सुरूवातीच्या काळात असतो व ज्या योजनेमधे, योजना सुरू झाल्यापासून ५ वर्षानंतर ही योजना सावधी विमा योजनेमधे परिवर्तीत हऊ शकते. |
- |
- |
कव्हरेज (संरक्षण व्याप्ती) |
विमा करारा अंतर्गत पुरविलेल्या संरक्षणाची व्याप्ती; एखाद्या योजनेच्या अंतर्गत येणा-या अनेक जोखिमींपैकी कोणतीही एक. |
4. |
घ |
डेज ऑफ ग्रेस (सवलतीचा कालावधी) |
विमाधारकाने विमा हप्त्याचा भरणा देय तारखेला केला पाहिजे. अश्या देय तारखेपासून १५-३० दिवसांच्या कालावधीमधे हप्ताभरण्याची मुभा असते, अश्या कालावधीला डेज ऑफ ग्रेस ( सवलतीचा कालावधी ) असे म्हणतात. |
- |
- |
डेफरमॆंट पिरीयड (लांबणीवर टाकलेला कालावधी) |
विमा असलेली निवृत्ती वेतन योजनेच्या सदस्यता तारखे पासून ते निवृत्ती वेतनाचा पहिला हप्ता मिळाल्याच्या तारखे दरम्यानचा कालावधी. सामान्यत: अश्या योजना, डेफरमेंट पिरीयडची किमान व कमाल मर्यादा विहीत करतात. |
- |
- |
डेप्रिसिएशन (घसारा) |
काही काळानंतर मालमत्तेच्या वापरामूळे मालमत्तेची झीज होऊन तिची किंमत कमी होणे वा नगण्य होणे. डेप्रिसिएशनचा वापर नुकसान झालेल्यावेळी मालमत्तेची प्रत्यक्ष रोख किंमत निश्चित करण्याकरिता केला जातो. |
- |
- |
डबल / ट्रिपल कव्हर प्लॅन्स (दुप्पट / तिप्पट संरक्षण असणा-या योजना) |
या योजना , योजनाकालावधीमधे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, आश्वस्त रकमेच्या दुप्पट / तिप्पट रक्कम परत देऊ करतात. परिपक्वता तारखेस हयात असल्यास,विमा उतरविलेल्या व्यक्तीस मोळ आश्वस्त रक्कम दिली जाते. या कमी हप्त्याच्या योजना असून गृहकर्जा सारख्या परिस्थितीसाठी सर्वात जास्त उपयुक्त असतात. |
5. |
ङ |
एम्बझलमेंट (अपहार) |
एखाद्याची काळजी घेण्याची जबाबदारी असणा-याने दुस-याचे मालमत्तेचा वा पैश्याचा गैरवापर किंवा अपहार करणे |
- |
- |
एण्डोवमेंट पॉलिसी (सावधी योजना) |
विमा उतरविणा-या व्यक्तीस वार्षिक हप्ता भरावयाचा असतो, जो योजना सुरू होतेवेळी विमाधारकाचे वय व योजनेची मुदत याचे आधारावर निर्धारित केला जातो. विम्याची रक्कम, ठराविक वर्षांच्या कालावधीचे शेवटास किंवा विमेदार व्यक्तीचा मृत्यू यापैकी जे आधी असेल, त्यावेळी देय्य असते. |
|
- |
- |
एक्सक्लुजन (अपवर्जन) |
ज्यासाठी योजना लाभ देत नाही, अश्या विशिष्ठ अवस्था किंवा परिस्थिती. |
- |
- |
एक्सेस एण्ड सरप्लस इन्शुरन्स (अतिरिक्त आणि अधिशेष विमा) |
- 1)अशी विमा योजना ज्यात विशिष्ठ रकमेपेक्षा जास्त असणारे नुकसान कव्हर केले जाते, जेंव्हा त्या रकमेपेक्षा कमी असणारे नुकसान नियमित योजने अंतर्गत कव्हर केलेले असते.
- 2)एखदी असामान्य किंवा एक वेळची जोखिम उदा. संगीतकाराच्या हाताचे झालेले नुकसान किंवा एखाद्या अधिवेशनातील अनेक धोके , ज्यासाठी बाजारातील सामान्य योजना संरक्षण पुरवित नाहीत.
|
6. |
च |
फॅकल्टेटीव्ह रिइन्शुरन्स (ऎच्छिक पुर्नर्विमा) |
एक प्रकारची पुनर्विमा योजना ज्यामधे पुनर्विमा करणारी कंपनी पुनर्विमा घेऊ इच्छीणा-या अन्य विमा कंपनीकडून देऊ केलेली जोखीम स्विकारू शकते किंवा नाकारू शकते.. |
- |
- |
फॅमिली इन्शुरन्स (कुटुंबाचा विमा) |
एका कराराद्वारे कुटुंबातील सर्व किंवा अनेक सदस्यांना विमा पुरविणारी योजना ,सामान्यत:,कुटुंबाला पोसणा-या प्रमुख व्यक्तीस संपूर्णा जीवन विमा व वैवाहिक साथीदार व पॉलिसी प्रसृत केल्या नंतर जन्माला आलेल्या मुलांसहित इतर मुलांना , लहान रकमेचा मुदतीचा विमा असतो. |
- |
- |
फिड्युशिअरी (विश्चस्त) |
अन्य व्यक्तीसाठी विश्वासाने काही ( मालमत्ता) धारण करणारी व्यक्तीआगीमूळे व विज कोसळण्यामूळे होणा-या नुकसानापासून, अधिक धूर व पाण्यामूळे झालेल्या नुकसानापासून संरक्षण. केंद्र शासनाने विकसित केलेल्या कार्यक्रमा अंतर्गत पुरापासून होणा-या नुकसानापासून संरक्षण पूर विमा योजनेमधे अत्यंत कमी किंमतीमधे उपलब्ध असते. |
- |
- |
फायर इन्शुरन्स (आगीचा विमा) |
आगीमूळे व विज कोसळण्यामूळे होणा-या नुकसानापासून, अधिक धूर व पाण्यामूळे झालेल्या नुकसानापासून संरक्षण. केंद्र शासनाने विकसित केलेल्या कार्यक्रमा अंतर्गत पुरापासून होणा-या नुकसानापासून संरक्षण पूर विमा योजनेमधे अत्यंत कमी किंमतीमधे उपलब्ध असते. |
- |
- |
फ्रान्चाईज इन्शुरन्स (विक्रीहक्काचा विमा) |
विम्याचे एक स्वरूप, ज्यामधे समान मालकाच्या कर्मचा-यांना किंवा एखाद्या मंडळाच्या सदस्यांना , एखाद्या व्यवस्थे अंतर्गत, ज्यामधे मालक किंवा मंडळ हप्ता गोळा करण्याचे व विमा कंपनीत भरण्याचे मान्य करतो/करते, वैयक्तिक विमा योजना, दिल्या जातात . |
7 |
छ |
जी आय एस (विमा हमी रक्कम) |
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन अक्षय योजनेअंतर्गत, भविष्यातील निवृत्ती वेतन खरेदी करण्यासाठी एकमुठी खरेदी किंमत दिली जाते. या रकमेला जी आय एस असे म्हंटले जाते. पहिला हप्ता भरल्यानंतर एक महिन्याचे काळानंतर, दरमहा देय्य असलेल्या निवृत्ती वेतनाची रक्कम, योजना सुरू होताना विमेदाराच्या वयाचे आधारे करण्यात येते. |
- |
- |
ग्रॉस इन्शुरन्स वॅल्यू एलीमेंट - जीआयवीई (एकूण विमा मूल्य तत्व) |
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या जीवन धारा योजनेमधील कालांतराने देय्य असलेली रक्कम . ‘जी आय वि ई’ च्या १% वार्षिकी, विलंबित कालानंतर दरमहा देय्य असते. तसेच विलंबित कालानंतर मृत्यू झाल्यावर संपूर्ण ‘जी आय वि ई’ देय्य होते. |
- |
- |
ग्रुप लाईफ इन्शुरन्स (समूह आयुर्विमा) |
एका प्रमुख योजनेअंतर्गत वैद्यकिय परिक्षेशिवाय लोकांच्या समुहाला प्रसृत केलेली विमा योजना. ही विशेषत: नियोक्त्याला ( कामावर ठेवणा-या मालकाचे नावे), कर्मचा-यांच्या भल्यासाठी किंवा एखाद्या मंडळाच्या सदस्यांसाठी , उदा. व्यावसायिक सदस्यांचा गट , प्रसृत केली जाते. गटातील व्यक्तीगत सदस्य, त्यांच्या विम्याचा पुरावा म्हणून दाखले त्यांचे जवळ ठेवतात. |
- |
- |
गॅरंटीड पॉलिसीज (हमीबध्द योजना) |
अश्या योजनांमधे पेमेंटची रक्कम निश्चित असते. |
8. |
ज |
इंडेम्निटी (क्षतिपूर्ती) |
एक कायद्याचे तत्व ज्याप्रमाणे ज्याचा विमा उतरविलेला आहे अश्या व्यक्तीने, नुकसानिच्या प्रत्यक्ष रोख मूल्यापेक्षा जास्त रक्कम घेता कामा नये, परंतु तो अंदाजे, नुकसान होण्यापूर्वी अस्तीत्वात असणा-या आर्थिक परिस्थितीच्या पूर्वस्थितीला आला पाहिजे. |
- |
- |
इन्शुरेबल इंटरेस्ट (विमा हित) |
अशी परिस्थिती जेंव्हा एखादी अक्षत घटना घडल्यास, विम्यासाठी अर्ज करणारा व ज्याला योजनेचे लाभ मिळावयाचे आहेत, त्याला जो भावनिक वा आर्थिक तोटा होईल ती. विमा हिताशिवाय असलेला विमा करार हा अवैध असतो. |
- |
- |
इन्शुरॅबिलिटी (विमायोग्यता) |
व्यक्तींसंबंधित सर्व अवस्था / परिस्थिती ज्यांचा व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम होतो ,त्यांना इजा होण्याची दाट शक्यता असते, अपेक्षित आयुर्मानावर परिणाम होतो; व्यक्तीच्या जोखिमीचे संक्षिप्त वर्णन |
- |
- |
इन्शुरन्स (विमा) |
नुकसाना संबंधीच्या अनिश्चिततेची जोखीम कमितकमी ठेवण्याचे एक सामाजिक साधन ज्यामधे नुकसानाच्या व्यक्तीगत शक्यतेचा अंदाज करण्यासाठी, समान शक्यता असणा-या , पुरेश्या मोठ्या संख्येच्या व्यक्तींमधे जोखीम, विस्तारणे. |
- |
- |
इन्शुअर्ड (विमाधारक) |
अशी व्यक्ती जिचे जीवन विमा योजनेने संरक्षित केलेले आहे. |
9. |
झ |
जॉइन्ट लाइफ एन्डोमेन्ट इन्शुरन्स प्लॅन्स (संयुक्त जीवन सावधी आश्वासन विमा योजना) |
या प्रकारच्या योजनांमधे आश्वासित राशी ( जमलेल्या बोनससह) सावधी मुदतीच्या शेवटी किंवा आश्वासित व्याक्तींपैकी प्रथम झालेला मृत्यू, यादोहोंपैकी जी घटना आधी घडेल, त्यावेळी देय्य होते. विशेषत:, ( जरी आवश्यक नसले तरी) ही योजना जोडप्यांकडून घेतली जाते कारण यातील वेगवेगळे पर्याय हे जोडप्यांनाच उपलब्ध असतात. या योजनेमधे, जर योजनेच्या मुदतीमधे मृत्यूच्या दोन्ही घटना घडल्या तर आश्वासित राशी, ही मृत्यूच्या पहिल्या घटनेवेळी देय्य असेल व पुन्हा मृत्यूच्या दूस-या घटनेवेळी ( जमा झालेल्या सर्व बोनससह) देय्य असेल. जर एक किंवा दोन्ही व्यक्ती मुदतपूर्तीच्या वेळी हयात असतील तर, जमा झालेल्या सर्व बोनससह आश्वासित राशी, मुदतपूर्तीच्या वेळी , देय्य असतील. या योजनेमधे हप्ता भरणे , मृत्यूच्या पहिल्या घटनेवेळी किंवा निवडलेली मुदत संपणे या पैकी जे आधी घडेल त्या वेळी थांबते. या योजनेतील आणखी एका पर्यायानुसार, हयात असलेल्या दोन्ही/ हयात जोडिदारास वार्षिकीचे प्रदानाची किंवा कायदेशीर वारसांना एकमुठी रक्कम प्रदानाची तरतूद आहे. |
10. |
ञ |
कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी (मह्त्वाच्या व्यक्तीचा विमा योजना) |
एक आयुर्विमा योजना जी एक व्यक्ती , दुस-या व्यक्तीच्या आयुष्यासाठी जो त्याचा कर्मचारी/त्याच्या व्यवसायाशी कोणत्याही प्रकारे निगडीत आहे किंवा होता. |
11. |
ट |
लॅप्स्ड पॉलिसी (रद्द झालेली पॉलिसी) |
समाप्त केलेली पॉलिसीव जी हप्ते भरणा न केल्यामूळे अस्तीत्वात नसलेली पॉलिसी. |
- |
- |
लिमिटेड पेमेंट लाईफ पॉलिसी (मर्यादित भरण्याची आयुर्विमा पॉलिसी) |
या मधे हप्ते ठराविक वर्षांच्या कालावधीसाठीच किंवा अश्या कालावधीमधे मृत्यू घडल्यास, मृत्यू घडेपर्यंतच भरावे लागतात. जेंव्हा विमा धारकाचा मृत्यू होतो, तेंव्हा पॉलिसीचे लाभ लाभार्थींना मंजूर केले जातात. पुन्हा, ही पॉलिसी ‘नफ्यासह’ किंवा ‘ नफ्याविना’ अश्या प्रकारची सुद्धा असु शकते. |
- |
- |
लॉयल्टी अॅडीशन्स ( निष्ठा जोड) |
लॉयल्टी अॅडीशन ही पॉलिसीच्या परिपक्वता झाल्यावर दिली जाते, त्यापूर्वी नाही. ही , आश्वासित रकमेच्या छोट्या प्रमाणातील रक्कम असते. ढोबळ्मानाने बोलावयाचे झाल्यास, लॉयल्टी अॅडीशन ही, विमा कंपनीचा परफॉरमन्स व पूर्व निश्चित वाढ यातील फरक आहे. एल आय सी ही विना – नफा संस्था असल्यामूळे ,मुल्यांकन झाल्यावर अतिरीक्त नफा विमाधारकांमधे वाटण्याचा एक प्रयत्न असतो. |
- |
- |
लाईफ अॅशुअर्ड (जीवन विमा) |
ज्या व्यक्तीचे आयुष्य , व्यक्तीगत विमा पॉलिसीद्वारा वीमित केलेले असते, त्याला लाईफ़ अॅश्युअर्ड असे म्हणतात.. |
12. |
ठ |
मॅच्युरिटी (परिपक्वता) |
अशी तारीख, ज्या तारखेला आयुर्विमा पॉलिसीवरील रक्कम , जर पूर्वीच आकस्मिक काराणांसाठी (मृत्यू) काधून घेतली नसेल तर ,विमाधारकाला दिली जाते, ती तारीख. |
|
- |
- |
मॅच्युरिटी क्लेम (मूदतपूर्ती दावा) |
विमाधारकाला, विमा पॉलिसीची सुनिश्चित मूदत पूर्ण झाल्यावर, अदा करण्यात येणा-या रकमेला मॅच्युरिटी क्लेम असे म्हणतात. |
- |
- |
मिसरिप्रझेंटेशन (चुकीचे स्पष्टीकरण) |
कोणताही अंदाज, उदाहरण, परिपत्रक किंवा प्रतिपादन, जे कोणत्याही योजनेच्या वा योजना वर्गाच्या , बिन्चूक शर्ती, लाभांश, किंवा अतिरीक्त रकमेमधील वाटा किंवा नाव किंवा शिर्षक दर्शवित नाही किंवा पॉलिसीच्या गटाचे वास्तविकत: खरे स्वरूप दर्शवित नाही , ते तयार करण्याचे, प्रसृत करण्याचे , प्रसारित करण्याचे,वा प्रसृत करण्यास वा प्रसारित करण्यास कारणीभूत होण्याचे कृत्य म्हणजे मिसरिप्रझेंटेशन होय. |
- |
- |
मनी बॅक पॉलिसी |
सावधी योजनांच्या उलट , मनी बॅक पॉलिसीमधे , विमाधारकाला, योजनेच्या मुदतीमधे ‘ हयात असल्या बद्दल रक्कम’ ठराविक काळाने दिली जाते आणी मुदत संपल्यावर हयात असल्यावर एकमूठी रक्कम दिली जाते. जर योअनेच्या कालावधीमधे मृत्यूझाल्यास, लाभार्थीला त्या तारखे पर्यंत दिलेल्या रकमे पोटी कोणतिही वजावट न करता, संपूर्ण आश्वासित रक्कम दिली जाते आणी त्यानंतर पुढील कोणतेही हप्ते भरावे लागत नाहीत. विमा धारकाच्या गरजेनुसार ठराविक वेळी मोठ्या रकमा मिळतील अश्या बेताने या योजनेमधे बदल करता येऊ शकत असल्याने, अश्या प्रकारच्या योजना खूप लोकप्रिय आहेत. |
- |
- |
मॉरल हजार्ड (नैतिक धोका) |
जोखीम ही, विमेदाराची विम्याची गरज, आरोग्याची स्थिती, व्यक्तीगत सवयी, राहणीमान आणी उत्पन्न यावर अवलंबून असते.मॉरल हजार्ड म्हणजे जोखिमीचे असे घटक , जे विमा कंपनीच्या जोखीम पत्करण्याच्या निर्णयावर परिणाम करतात. |
13. |
ड |
नॉमिनेशन ( नाम निर्देशन) |
नॉमिनेशन म्हणजे असे कृत्य ज्यायोगे विमाधारक, योजनेची रक्कम स्विकारण्यास अन्य व्यक्तीस अधिकृत करतो. जी व्यक्ती अशी अधिकृत केली जाते तिला ‘ नॉमिनी’ असे म्हणतात. |
- |
- |
नॉन कॅन्सलेबल पॉलिसीज (रद्द न केल्या जाणाऱ्या योजना) |
अश्या पॉलिसीज, जोपर्यंत वेळोवेळी हप्ते भरले जातात तोपर्यंत जे काही घडू शकेल, त्याची पर्वा न करता चालू राहतात. |
14. |
ढ़ |
प्रिमीयम ( विम्याचा हप्ता) |
विमाधारक, विमेदाराला , विमेदाराच्या करारानुसार निर्दिष्ट आकस्मिक घटना ( उदा. मृत्यू) घडल्यावर, विमाधारकाला लाभ प्रदान करण्याच्या जबाबदारीच्या बदल्यात , एकवेळ किंवा नियमित कालबध्द भरण्यांपैकी एक भरणा करतो त्यास हप्ता असे म्हणतात. |
- |
- |
प्रिमीयम बॅक टर्म इन्शुरन्स प्लॅन्स (विमाहप्ते परत देणारा मुदत विमा योजना) |
या योजनांमधे,विमाधारक योजनेच्या मुदतपूर्ती अखेर हयात असण्याच्या घटनेमध, भरलेल्या सर्व हप्त्यांचा परतावा देण्याची तरतूद असते. जर योजनेच्या कालावधिमधे विमेदाराहा मृत्यू झाल्यास, संपूर्ण आश्वस्त रक्कम लाभार्थींना दिली जाते. |
15. |
ण |
रीइन्स्टेटमेंट (पुनर्नियुक्ती) |
रद्द झालेल्या पॉलिसीची चालू स्थितीमधे पुनर्स्थापना.सवलतीचा कालावधी संपल्या नंतरच पुनर्नियुक्ती होऊ शकते.कंपनीला विमा करण्याच्या योग्यतेचा पुरावा( जर आरोग्याची स्थिती बदलली असल्यास , पुनर्नियुक्ती नाकारू शकते) लागू शकतो आणि मागील देय्य हप्त्याच्या संपूर्ण रकमेचा भरणा , नेहमीच आवश्यक असतो. |
- |
- |
रिस्क (जोखीम) |
जोखीम म्हणजे विमाकंपनी जेंव्हा पॉलिसी प्रसृत करते तेंव्हा गृहित धरलेले दायित्व. लोकसंख्येच्या व्यापक आधारामधे जोखीम विस्तारणे,सांख्यकिय शक्यतांसाठी केलेली जुळवणुक व प्रलयंकारी नुकसानापासून संरक्षण हाच विम्याचा मुख्य हेतू आहे. जोखीमेच्या गृहिताच्या हेतूकरिता मृत्यूकडे एक आकस्मिक घटना म्हणून पाहिले जाते. म्हणजे, मृत्यू जरी निश्चित असला तरी, त्याची वेळ माहित नसते. जोखीमेच्या मुल्यांकनाच्या व निवडीच्या प्रक्रीयेस अंडरराईटींग (अंतर्लेखन) असे म्हणतात. |
16. |
त |
सॅलरी सेव्हींग स्कीम (पगार बचत योजना) |
या योजने अंतर्गत, एम्प्लॉयरने , कर्मचा-यांच्या पगारातून पैसे कापून हप्ते भरण्याची तरतूद असते.. |
- |
- |
सब स्टॅंडर्ड रिस्क (दुय्यम दर्जाची जोखीम) |
शारिरिक अवस्था , कौटुंबिक वा वैयक्तिक व्याधीचा इतिहास,व्यवसाय, अनारोग्यकारी वातावरणातील घर वा धोकादायक सवयी आदींमूळे, एखादी व्यक्ती विम्याची विकल किंवा सरासरीपेक्षा जास्त विमा जोखीम म्हणून ठरविली जाते. |
- |
- |
सरेंडर व्हॅल्यू (समर्पण मूल्य) |
विमा पॉलिसीच्या पक्वतेपूर्वी विमाधारकाने पॉलिसी समाप्त करण्याचे ठरविल्यास त्याला जे मूल्य देय्य ठरते ते. |
- |
- |
सर्व्हायवल बेनिफीट (सजीविततेचा लाभ) |
पैसे परतावा योजनेअंतर्गत हप्त्याने देय्य झालेल्या आश्वासित रकमेचे विमाधारकाला केले जाणारे प्रदान |
17. |
थ |
व्हेस्टींग एज ( सुपुर्द करण्याचे वय) |
विमा-कम- निवृत्ती योजनेअंतर्गत ज्या वयाला निवृत्ती वेतन मिळण्यास सुरूवात होते ते वय. |
18. |
द |
होल लाईफ पॉलिसी ( संपूर्ण जीवन विमा योजना) |
विमेदाराच्या संपूर्ण हयातीमधे हप्ते भरले जातात. ही योजना ‘ नफ्यासह ‘ किंवा ‘ नफ्याविना” असू शकते. ( ‘नफ्यासह’ योजना एल आय सी दर वर्षी जाहीर करीत असलेल्या विवीध बोनससाठी पात्र असते परंतू ‘नफ्याविना’ योजनेला हा विशेष अधिकार नसतो. |
- |
- |
विथ प्रॉफीट पॉलिसी (नफ्यासह योजना) |
विमा योजना ज्याना बोनस मिळविण्याचा हक्क असतो, जो ‘नफ्यासह’ योजनांमधे मृत्यू किंवा मूदतपूर्तीच्या वेळी दिला जातो. |
- |
- |
विदाउट प्रॉफीट पॉलिसी (नफ्याविना योजना) |
या योजनांना बोनसमधे सहभागी होण्याचा हक्क नसतो. |